माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनतील..निलेश राणे यांची X पोस्ट

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबावर टीका करण्याशिवाय काहीही केलं नाही. वैभव नाईक यांची सुद्धा याच दिशेने वाटचाल सुरू आहे अशी एक्स पोस्ट आमदार निलेश राणे यांनी केली आहे त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केलीय.ते म्हणतात की, …माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
आपल्याला अनेकांना माहित नसेल परशुराम उपरकर म्हणजे कोण, राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते त्यानंतर राणेसाहेबांनी शिवसेना सोडली त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबजी केली, राज साहेबांनी कार्यकारणी बरखास्त करून याची हकालपट्टी केली. हा ऊबाठात गेला आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरची आहे. याचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची.
आज बघायला गेलं तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत.
वैभव नाईक, काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, लोकं तुमचं नाव लक्षात ठेवतील असं कार्य काहीतरी उभं करा नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार.

error: Content is protected !!