मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गोशाळेच्या ठिकाणी घेतली भेट

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजना साठी व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या कणकवली येथील गोशाळा उद्घाटनासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोशाळा येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, डॉ. तुषार भोसले उपस्थित होते.

error: Content is protected !!