उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

मालवण येथे राणेंच्या निलरत्न बंगल्यावर घेतली भेट

मालवण राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुजना साठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मालवण येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, शिवसेना नेते संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!