माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे पंचशील सेवा मंडळाला 50 हजाराची साऊंड सिस्टिम भेट

कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ साऊंड सिस्टिम प्रदान

माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी मंडळाला साऊंड सिस्टिम केली प्रदान

भिरवंडे बौद्धवाडी येथील पंचशील सेवा मंडळ यांच्या मागणी नुसार माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आपले बंधू कै सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ 50 हजार किमतीची साउंड सिस्टीम भेट दिली आहे. माजी जि प अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते भिरवंडे बौद्धवाडी समाज मंदिर येथे मंडळाकडे साऊंड सिस्टिम चे साहित्य सुपूर्द केले. पंचशील सेवा मंडळ दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, असे विविध कार्यक्रम आयोजित करीत असते. त्यासाठी त्यांना भाडे देऊन साउंड सिस्टीम आणावी लागत असे. मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या कडे ही बाब सांगितली. यावेळी बोलताना सौ संजना सावंत यांनी भिरवंडे बौद्धवाडी च्या विकासासाठी आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहणार असून राहिलेली विकासकामे ही संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितलले. यावेळी पंचशील सेवा मंडळाचे अध्यक्ष भीमराव कांबळे, यांनी संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आमच्या साउंड सिस्टीम च्या मागणीची दखल लगेच घेतली त्याबद्धल आभार व्यक्त केले यावेळी भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, सांगवे माजी सरपंच मयुरी मुंज, मीनल पवार,पत्रकार विनय सावंत, श्यामसुंदर सावंत,जेष्ठ ग्रामस्थ विठ्ठल पवार, तुकाराम पवार,प्रशांत कांबळे राजू जाधव, स्वप्नील जाधव, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!