चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर

सहकार न्यायालयाचा अनधिकृत संचालक मंडळाला दणका

अक्षदा शिवाजी मडवळ यांनी न्यायालयात केला होता अर्ज

कणकवली शहरातील गांगो मंदिरसमोरील महामार्गालगत असलेल्या चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक प्रक्रिया कोल्हापूर येथील सहकारी न्यायालय क्रमांक २ ने बेकायदेशीर ठरवली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या संचालक मंडळाला संस्थेचे काम करण्यास कायमची मनाई करण्यात आली आहे. असा निर्णय सहकार न्यायालयाने दिला आहे.
चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना २९ जून २०१९ रोजी झाली. या संस्थेत ३८ फ्लॅट आणि १० दुकानगाळे आहेत. या संस्थेचे कामकाज पाच महिने
व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर सात सदस्यांनी १६ नोव्हेंबर २०१९ रोजी एकत्रितपणे राजीनामा दिला. त्यामुळे सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी २३ मार्च २०२० रोजी या संस्थेवर प्रशासक नेमला. ६ ऑगस्ट २०२० रोजी सहायक निबंधक एल. एस. लष्कर यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर ३१ मे २०२१ रोजी लष्कर यांनी आदेश जारी करून रविकिरण शांताराम खांडेकर यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
चिंतामणी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेची सन २०२०-२१ मध्ये निवडणूक होणे आवश्यक होते.
४८ मालमत्ताधारक सदस्य असताना नियमबाह्यपणे जास्त सदस्य दाखविण्यात आले.
मात्र, कोविड प्रादुर्भाव असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सन २०२१-२२ ते २०२६-२७या वर्षासाठी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ४८ मालमत्ताधारक सदस्य असताना नियमबाह्यपणे जास्त सदस्य दाखविण्यात आले. संस्थेची सन २०२१-२०२२ ते २०२६-२७ साठी निवडणूक कार्यक्रम आणि मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात केवळ १९ सदस्यांचा समावेश केला. त्याला अनेक सभासदांनी आक्षेप घेतला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी किरण निकम, प्रशासक रविकिरण खांडेकर
आणि सहायक निबंधक यांच्याकडून त्या आक्षेपाला उत्तर देण्यात आले नाही. या सर्व प्रक्रियेविरोधात सभासद अक्षदा शिवाजी मडवळ यांनी कोल्हापूर येथील सहकार न्यायालयात १५ सप्टेंबर २०२२ रोजी दावा दाखल केला होता. त्याचा निकाल २६ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. यात न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवली आहे. निवडून आलेले धनराज नामदेव दळवी, प्रसन्न दीनानाथ देसाई, उमेश गणपती कामत, दामोदर भालचंद्र खानोलकर, नीलेश गोपीनाथ पाटणे, उमेश यशवंत राणे, रंजन बाळकृष्ण चिके, प्रियांका प्रकाश दळवी, माही मंदार परुळेकर, अनंत परशुराम बंडागळे यांना बेकायदेशीर ठरविले. वादीतर्फे ॲड. संजय डीक्रूज, कोल्हापूर यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!