हनिफ निशानदार यांचे निधन

मूळ वरवडे – खालची मुस्लिमवाडी येथील व सध्या कणकवली – स्टेट बँकेनजीक स्थायिक असलेले हनिफ सुलेमान निशानदार (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार, १८ एप्रिलला सकाळी ८ वाजता राहत्या घरी निधन झाले. हनिफ हे जुन्या काळात कणकवली शहरात व्हिडिओ सेंटर चालवत होते. त्यानंतर त्यांनी रिक्षा व्यवसायही केला. पुढे गेली कित्येक वर्षे ते येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकानजीक ‘निशानदार कम्युनिकेशन’ हे मोबाईल रिचार्ज व झेरॉक्स सेंटर चालवत होते. त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगा, सून, दोन विवाहीत मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ‘निशानदार कम्युनिकेशन’चे चालक मुन्ना उर्फ अस्लम निशानदार यांचे ते वडील होत.