खारेपाटण -टाकेवाडी येथील रस्ता व मोरी कामांचे भूमिपूजन संपन्न

कणकवली तालुक्यातील खारेपाटण -टाकेवाडी येथील रस्ता व मोरी कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. जेदे वाडी ला जोडणारा रस्ता तसेच मोरी कामाचे भूमिपूजन माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 25लाख एवढा निधी मंजूर झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या भूमिपूजन वेळी सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य -दक्षता सुतार तसेच वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.