आचरा येथील युवक राजेश ( राजू )केळकर याचे निधन

आचरा -पारवाडी येथील  राहिवासी राजेश ( राजू ) रवींद्र केळकर वय वर्षे 33 याचे शनिवारी दुपारी दुःखद निधन  झाले. शनिवारी दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आचरा येथील खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले होते.मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी मालवण येथील  खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. हसतमुख व्यक्तीमत्त्व असलेले राजेशचा स्वभाव  मनमिळाऊ   होता. त्यामुळे तो सुपरिचित होता.त्याला तबला वादन गायन कलेची आवड होती. लक्झरीवर ड्रायव्हिंग देखील करत असे. मुंबई येथे पौराहित्य करत होते.त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी रात्री आचरा पारवाडी स्म्शानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्चात आई, वडील,भाऊ, काका, काकी, पुतणे,पुतणी असा त्यांचा परिवार आहे.केळकर कुटुंब आचरे गावातील पौरोहित्य कुटूंबं म्हणून परिचित आहे. कोईमतूर पोलीस अधिक्षक सुब्रमण्यम केळकर, पोलीस कर्मचारी मकरंद केळकर यांचे ते चुलत भाऊ होत. त्याच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!