शिवडाव चिंचाळवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कणकवली/मयूर ठाकूर
शिवडाव चिंचाळवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यामध्ये शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सात वाजता लहान मुलांचे “फनी गेम” तसेच रात्री आठ वाजता प्रसिद्ध निवेदक आणि जिल्ह्यातील दुसरे आदेश भाऊजी म्हणून ओळख असलेले बाळू वालावलकर यांनी होस्ट केलेला कार्यक्रम “खेळ पैठणीचा” तसेच रात्री दहा वाजता सुस्वर स्थानिक भजनांच आयोजन करण्यात आला आहे.तसेच शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी सात वाजता हनुमान जन्मोत्सव,दुपारी एक वाजता महाप्रसाद,सकाळी दहा वाजता गणेश पूजन,सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तसेच रात्री आठ वाजता लकी ड्रॉ सोडत आणि खास आकर्षण म्हणून रात्री दहा वाजता ग्रामदेवता पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ बिडवाडी यांचे महान पौराणिक नाट्यप्रयोग “भक्तांचा कैवारी कृष्ण मुरारी”या दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आलेल आहे.शिवडाव चिंचाळवाडी येथील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून सर्व भक्त गणांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.