कलमठ गावडेवाडी गायत्री युवा प्रतिष्ठान व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

51 रक्तदात्यांनी घेतला शिबिरात सहभाग

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त दर वर्षी गायत्री युवा प्रतिष्ठान गावडेवाडी, कलमठ आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर वर्ष 10 वे आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी कलमठ गावडेवाडी येथे आयोजित केले होते.
या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक महाकार्यात हातभार लावला. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, रामदास विखाळे, स्वप्निल चिंदरकर, गायत्री मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक खाजणवाडकर, खजिनदार रामचंद्र उर्फ बाळा चिंदरकर, सचिव भानुदास चिंदरकर, बाळा आचरेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस, सचिव सुशील परब, देवेन सावंत, सहसचिव विनू महाडिक, दुर्गाप्रसाद काजरेकर, गायत्री युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सतीश चिंदरकर आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!