रफिक नाईक उतरणार निवडणुक रिंगणात

खारेपाटण पं. स. निवडणूक शिवसेना शिंदे पक्षाकडून लढवण्यास इच्छुक

खारेपाटण येथील उद्योजक तसेच माजी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक उस्मान नाईक खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून शिंदे शिवसेना पक्षाकडून आपण स्वतः निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक मतदार संघात इच्छुक उमेदवार आता आपली इच्छा प्रकट करू लागले आहेत. खारेपाटण येथील युवा उद्योजक तसेच माजी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक उस्मान नाईक हे देखील खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून शिंदे शिवसेना पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ हा सर्वसाधारण जाहीर झाला असून खारेपाटण शहराच्या स्थानिक उमेदवाराचाच या मतदार संघावर आजपर्यंत प्रभाव राहिलेला आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी या अगोदरच या मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पक्ष श्रेष्टीकडे अर्ज केलेले आहेत. यातच आता रफिक नाईक यांनी खारेपाटण पं. स. मतदार संघासाठी आपली इच्छुकता दर्शवल्यामुळे नेमकी सीट कोणाला मिळेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रफिक नाईक हे यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून काम केलेले कार्यकर्ते असून खारेपाटण ग्रामपंचायमध्ये देखील ते ग्रा. पं. सदस्य म्हणून स्वतंत्र निवडून आले होते. याबरोबरच कोरोना काळात रुग्णांना मदत करणे तसेच पूर आपत्ती परिस्थितीत देखील नागरिकांना त्यानी मदत केलेली आहे. जर पक्षाने आपल्याला निवडणुक लढविण्याची संधी दिल्यास आपण या संधीचे सोने करू, असा विश्वास देखील रफिक नाईक यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!