माघी गणेश जयंती निमित्त आचरा हिर्लेवाडी येथे विविध कार्यक्रम

आचरा हिर्ले वाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त पंढरीनाथ मंदिर येथे गुरुवार २२ जानेवारी ते सोमवार २६ जानेवारी या कालावधीमध्ये गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त २२ जानेवारी सकाळी नऊ वाजता श्रींची प्रतिष्ठापना, विधिवत पूजन आरती दुपारी महाप्रसाद ,रात्रौ दहा वाजता खेळ पैठणीचा हा महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद रात्रौ दहा वाजता पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग २६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसाद रात्रौ श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ मालवण गवंडी वाडी यांचा शेजारी पडलो आजारी हे दोन अंकी नाट्य प्रयोग होणार आहे. २५ जानेवारी रोजी रात्रौ नऊ वाजता देखावा युक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धा होणार आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मिरवणुकीने श्रींचे विसर्जन होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष लवू मालंडकर यांनी केले आहे.




