शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याला सशर्थ जमीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याला अखेर तीन लाख रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयीत आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला. संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला 3 लाख रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्याला तपासी अधिकारी याना सहकार्य करणे , साक्षीदारांवर दबाव न आणणे, पोलिस स्टेशन कणकवली येथे प्रत्येक मंगळवारी हजेरी लावणे , सिक्युरिटी म्हणून रक्कम रु ७ लाख न्यायालयात भरणा करणे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर न जाणे, सरकार पक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये आदी अटी घातल्या आहेत.
पोलिसांनी शुक्रवार ४ एप्रिल रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. याबाबतची फिर्याद सर्वेश हरि भिसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.
सर्वेश भिसे यांच्या फिर्यादीनुसार, 25 मे 2022 ते 11 ऑक्टोंबर 2024 या मुदतीत आरोपी स्वप्निल बेळेकर याने सर्वेश भिसे याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच तुला दहा ते बारा टक्के दरमहा परतावा दिला जाईल असे सांगितले या आमिषाला बळी पडून सर्वेश भिसे याने देवकन्या बिजनेस वर्ल्ड या कंपनीत 12 लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर स्वप्निल बेळेकर यांना चार लाख 77 हजार रुपये सर्वेश भिसे याला दिले. मात्र उर्वरित सात लाख 23 हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे सर्वेश भिसे याला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले व त्याने कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत होते. त्यादरम्यान संशयित स्वप्निल बेळेकर याला पोलिसांनी वैभववाडी येथून चार एप्रिल रोजी ताब्यात घेत अटक केली. 9 एप्रिल रोजी आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालया समोर हजर केला असता आरोपी जवळ चौकशी करायची असल्याचा युक्तिवाद करत चार दिवसांच्या पोलिस कोठडी ची मागणी केली. मात्र या बाबत अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद करत आरोपीची बाजू न्यायालयासमोर बाजू मांडली त्यावर न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर संशयित आरोपीच्या जमिनीसाठी अर्ज करण्यात आला तो अर्ज मंजूर करण्यात आला. संशयीताच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!