शिवडाव चिंचाळवाडीत आठ आणि नऊ एप्रिल रोजी ब्राह्मणदेवाचा हरिनामसप्ताह.

रात्रौ अकरा वाजता मंदिरात अवतारणार साक्षात श्री देव शिवशंकर,विठ्ठल-रुक्मिणी,श्री स्वामी समर्थ,राधा-कृष्ण आणि देव हनुमंत.

खास आकर्षण-सादर होणार स्वयंभू प

प्रासादिक चक्रीभजन मंडळ पियाळी करमळकर वाडी बुवा.संतोष कानडे यांच देखाव्यांसहित चक्री भजन.

कणकवली/मयूर ठाकूर.

 कणकवली तालुक्यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील हरिनाम सप्ताह दिनांक 8 आणि 9 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांच आयोजण करण्यात आलेल आहे.यामध्ये मंगळवार दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी.सकाळी 10.30 वा.घटस्थापना,दुपारी 1वा.-महाप्रसाद,दु.2 ते सा.6 पर्यंत स्थानिक भजने,सा 6 ते रात्रौ.7.30 वा हरिपाठ,रात्रौ 7.30 ते 9 वा संगीत भजन - बुवा रवी मेस्त्री,रात्रौ 9 ते 10 वा संगीत भजन - बुवा ओंकार सावंत

(सांगवे केळीचीवाडी).रात्रौ 10 ते 11 वा संगीत भजन-विश्वकर्मा भजन मंडळ भरणी-भजन सम्राट भजनीबुवा योगेश पांचाळ,तसेच या हरिनाम सप्ताहाचे खास आकर्षण म्हणून
रात्रौ 11 ते 1 वा.स्वयंभू प्रसादिक चक्री भजन मंडळ पियाळी करमळकरवाडी यांच्या चक्रीभजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल आहे.या चक्रीभजनाच्या माध्यमातून श्री.स्वामी समर्थ,श्री देव विठ्ठल,श्री देव शंकर,राधा-कृष्ण आणि हनुमंत यांचे देखावे मंदिरामध्ये अवतरणार आहेत.राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बुवा.संतोष कानडे हे या चक्रीभजनाचे गायक आहेत.तसेच रात्रौ 1 ते 3 वा रामेश्वर पावनादेवी गांगेश्वर दिंडी भजन किर्लोस.ता मालवण.जिल्ह्यातील प्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा.गोपी लाड यांचे भजन सादर होणार आहे.तसेच रात्रौ 3 ते पहाटे 7 पर्यंत-श्री.देव ब्राम्हण देवाचा जागर होणार असून बुधवार दिनांक 09 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा घटविसर्जन,दु 1 वा महाप्रसादाणे या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने शिवडाव चिंचाळवाडी येथे जनसागर लोटलेला पाहायला मिळतो.गावात प्रसिद्ध असलेला हा सप्ताह अनेक धार्मिक कार्यक्रमांच आकर्षण गतवर्षी ठरतो.गावातील-वाडीतील सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ,तसेच स्थानिक नागरिक, पाहुणेमंडळी,माहेरवासिनी आणि मोठ्या संख्येने चाकरमानी या कार्यक्रमाला उपस्थित असतात.एक वेगळा अत्यानंद या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवडाव चिंचाळवाडी येथे निर्माण झालेला पाहायला मिळतो.या धार्मिक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा भाग जणू पंढरीचे रूप धारण करतो.या हरिनाम सप्ताहास आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!