वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या ग्रामस्थांना कागदपत्रे मिळणार नाहीत

कासार्डे येथील ग्रामसभेत एकमुखी ठराव
कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीच्या वतीने जे ग्रामस्थ आपल्या वृध्द आईवडीलांचा सांभाळ करणार नाही त्यांना ग्रामपंचायत कासार्डे कडून कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. बहुधा जिल्हात असा ठराव घेणारी कासार्डे ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत असल्याने या निर्णयाचा सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
सदरचा ठरावासाठी सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते यानी पुढाकार घेतला असून ४ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमुखी ठराव घेण्यात आला आहे.यावेळी माजी जि.प.सदस्या संजय देसाई,माजी उपसभापती प्रकाश पारकर,माजी सरपंच संतोष पारकर,तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे,सर्व पोलीस पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सध्या वृध्दाश्रमात वाढत असेली वयोवृध्दाची संख्या पाहता हा निर्णय योग्यचा असल्याने या ठरावाला ग्रामस्थांनी एकमुखी संमत केला आहे. त्याच बरोबर कासार्डे गावात व्यवसाय व काम करण्यासाठी येणारे परप्रांतीय फेरीवाले,भाजीपाला,भंगार विक्रेते, चिरेखाण कामगार,सिलिका कामगार यानीही गावात येऊन व्यवसाय व काम करण्यापूर्वी प्रथम ग्रामपंचायत कासार्डे, पोलीस पाटील यांच्याकडे रितसर नोंदणी करुन परवानगी घेतल्यानतंर गावात व्यवसाय व काम करण्याची मुभा राहिल अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
तसेच वाढती गुन्हेगारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडोत्र्याची माहिती ग्रामपंचायतीकडे जमा करावी असेही सांगण्यात आले असून यामुळे गवातील सुरक्षेसाठी आधीच एक पाऊल ग्रामपंचायतीने घेतल्याने नागरीकांकडून प्रतिसाद मिळत आहे.यासाठी कासार्डे ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय जिल्हातील सर्वच ग्रामपंचायतीना अनुकरणीय असल्याचे लोकप्रतिधीकडून सांगण्यात येत आहेत.