आचरा बौद्ध विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

आचरा : आचरा बौद्धवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजमंदिर येथे विद्याधर आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध विकास मंडळ गावशाखा आचरेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सभेमध्ये बौद्ध विकास मंडळ आचरा (गावशाखा)च्या नूतन कार्यकारणीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. धनंजय आचरेकर तर सचिवपदी विनोद आचेरकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विशाल कांबळे, मयूर आचरेकर, सहसचिव तुषार आचरेकर, खजिनदार चंद्रशेखर आचरेकर तर सदस्य म्हणून नंदकुमार आचरेकर, विश्वास आचरेकर, उदय आचरेकर, पुनाजी आचरेकर, सिद्धार्थ आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर यांची निवड करण्यात आली.
फोटो : डॉ . धनंजय आचरेकर
फोटो : विनोद आचरेकर