मालवण एलआयसी शाखेची तेजोमय कामगिरी

मालवण एलआयसी शाखाधिकारी सतेजा बोवलेकर यांनी मालवण एलआयसी शाखेच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

मालवण..सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळ मालवण एलआयसी शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत सेव्हन पीलर्स टार्गेट पूर्ण केलं आहे. मालवण ही सेवन पिलर्स टार्गेट पूर्ण करणारी दुसरी शाखा ठरली आहे. 1971 मध्ये मालवण एलआयसी शाखेची स्थापना झाली. या 54 वर्षात प्रथमच सर्व उद्दिष्टे मालवण एलआयसीच्या शाखेने पूर्ण केली आहेत. या उद्दिष्टपूर्ततेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शाखाधिकारी श्रीमती. सतेजा बोवलेकर यांचं विशेष योगदान आहे.
पॉलिसी, सिंगल प्रिमियम,नॉन सिंगल प्रिमियम,फर्स्ट इयर रिन्यूअल प्रिमियम, टोटल प्रिमियम, गॅरेंटेड आणि युलिप प्रिमियम, व्हेटेड रिसिव्ह प्रिमियम अशा सात ही विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखेला सेवन पिलर्स हे मानांकन दिलं जातं. सर्व क्षेत्रात कामगिरी करणं हे खूप अवघड काम असतं. मालवण एलआयसी शाखा ही तसं पाहता ग्रामीण भागातील शाखा म्हणून ओळखली जाते. मात्र कोणतेही कारण न सांगता या सातही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत मालवण शाखेने कोकण विभागात आपलं स्थान मिळवल आहे.एलआयसीच्या मालवण शाखेची 1971 मध्ये स्थापना झाली . या 54 वर्षात प्रथमच अशा पद्धतीचा मान मालवण शाखेला मिळाला आहे. यात शाखाधिकारी श्रीमती. सतेजा बोवलेकर यांचं उत्कृष्ट नेतृत्व आणि नियोजन यामुळे हे काम शक्य झालं आहे. मालवण शाखा या सातही विभागात चांगलं काम करणारी शाखा ठरली आहे. विशेष म्हणजे मालवण ही अशी कामगिरी करणारी कोकणातील चिपळूण नंतरची दुसरी शाखा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती होण्याआधी पासून मालवण शाखा अस्तित्वात आली आहे. मात्र इतिहासात प्रथमच या सातही विभागात या शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मालवण शाखेच्या शाखाधिकारी श्रीमती .सतेजा बोवलेकर यांच्यावर कौटुंबिक संकट कोसळलं असताना सुद्धा त्यांनी प्रथम कार्यकर्तव्य मानून कुठेही आपला निर्धार कमी पडू दिला नाही.त्यांनी सर्व एलआयसी प्रतिनिधींचा आणि एलआयसी कर्मचारी यांचं योग्य पद्धतीने काम होतं की नाही यावर नियोजन करून ही कामगिरी पूर्ण केली आहे. त्यामुळे मालवण शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एलआयसीच्या मालवण शाखेची नेतृत्व पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शाखाधिकारी श्रीमती. बोवलेकर यांनी सर्व कर्मचारी विमा प्रतिनिधी आणि विमा घेणारा ग्राहक यांच्यात एक समन्वय निर्माण केला. एलआयसी बद्दल जनजागृती निर्माण केली . एलआयसी का हवी याबद्दल लोकांच्या मनात जागृती निर्माण करून इथपर्यंत कामकाज पूर्ण केलं आहे. एलआयसी वर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे महान कार्य घडू शकले .एका स्त्री अधिकाऱ्याने अनेक संकट समोर असतानाही घेतलेली झेप कौतुकास्पद मानली जात आहे. त्यांच्या या प्रयत्ना बरोबरच शाखाधिकारी सतेजा बोवलेकर यांना मोठी खंबीर साथ मिळाली ती कोल्हापूर चे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर आदरणीय श्री. विवेक देशमुख सर, मार्केटिंग मॅनेजर श्री. अभय कुलकर्णी सर, मॅनेजर सेल्स कोशटवार सर, प्रॉडक्ट मॅनेजर संजय पाटील… डेप्युटी मॅनेजर Clia सुरेंद्र मोरे यांची त्यांना साथ मिळाली .तसेच मालवण शाखेतील मार्केटिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ , विमा प्रतिनिधी आणि एलआयसी कर्मचारी यांचे त्यांना सहकार्य लाभले.

error: Content is protected !!