कणकवली पंचायत समितीमध्ये अर्ज निवेदन स्वीकारणारा सामान्य प्रशासन विभाग आता जनतेला सहज भेटणार

कृषी, एमआरजीएस विभाग पहिल्या मजल्यावर स्थलांतरित
शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत बीडिओ अरुण चव्हाण यांचा निर्णय
कणकवली पंचायत समितीमध्ये यापूर्वी पहिल्या मजल्यावर असलेला सामान्य प्रशासन कक्ष आता तळमजल्यावर आणण्यात आला आहे. तर तळमजल्यावर असलेला कृषी विभाग व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना चे कार्यालय आता पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असताना सामान्य प्रशासना च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची निवेदने स्वीकारणे किंवा जनतेशी संवाद साधने आधी कामे ही या अधीक्षक व अन्य अधिकाऱ्यांमार्फत केली जातात. व हे अधिकारी पहिल्या मजल्यावर असल्याने नागरिकांना व वयोवृद्धांना पहिल्या मजल्यावर जाणे त्रासदायक बनत होते. या सर्व बाबींचा विचार करत कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी या कार्यालयाचे स्थलांतरण करत जनसामान्यांना अधिकाऱ्यांना भेटणे सोपे जावे व अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिने चढून जाण्याऐवजी तळमजल्यालाच निवेदने देता यावी तसेच अधिकारी भेटावेत या उद्देशाने बदल केला. तसेच या अंतर्गत कणकवली पंचायत समितीच्या काही भागाची डागडुजी व सुशोभीकरण देखील करण्यात आले. कणकवली पंचायत समितीची इमारत झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये इमारतीच्या आतील भागातील भिंतींना लावलेल्या स्टाईल कोसळल्या होत्या. या मुळे अंतर्गत कार्यालयाची दुरावस्था दिसत होती. मात्र याबाबत या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत निर्णय घेत या संपूर्ण भागाची डागडुजी करण्यात आली. जेणेकरून कार्यालय नीटनेटके दिसावे या उद्देशाने हे काम देखील करून घेण्यात आले. कणकवली पंचायत समितीच्या या उपक्रमामध्ये सामान्य प्रशासन विभागांतर्गत येणारी टपाल किंवा अर्ज स्वीकारणे ही सेवा तळमजल्याला आणल्याने आता जनतेला ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाने खऱ्या अर्थाने त्याचा जनतेला फायदा होणार आहे. याच सोबत कणकवली पंचायत समितीच्या अभिलेख कक्षामध्ये असलेल्या अभिलाखांचे वर्गीकरण व अभिलेख सुस्थिती ठेवणे हा उपक्रम देखील गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला असून त्याचे काम देखील प्रत्यक्षात सुरू आहे.