महाराष्ट्र एसटी कामगार सेना कणकवली तालुकाप्रमुख पदी उत्तम लोके

वाढदिवसा दिवशी नव्या पदाची माळ पडली गळ्यात

महाराष्ट्र एसटी कामगार सेना कणकवली तालुका प्रमुख या पदावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 _ 26 करिता ही निवड करण्यात आली असून कणकवली आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांना, समस्यांना प्रशासनाकडून न्याय मिळवून द्या असे नियुक्ती पत्रात विभागीय अध्यक्ष अनुप नाईक व विभागीय सचिव भगवान तारी यांनी म्हटले आहे. आज 16 एप्रिल रोजी उत्तम लोके यांचा वाढदिवस असून त्या दिवशी त्यांना या पदावर नियुक्ती देण्यात आल्याने उत्तम लोके यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!