तरंदळे येथील उमेश सामंत यांचे निधन

कणकवली तालुक्यातील तरंदळे _ कुंदेवाडी येथील रहिवासी उमेश राजाराम सामंत (67) यांचे 14 एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तरंदळे _ कुंदेवाडी येथील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभागा असे. मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे व पत्नी असा परिवार आहे. तरंदळे कुंदेवाडी येथील अंगणवाडी सेविका उर्मिला सामंत यांचे ते पती होत.

error: Content is protected !!