सिंधुदुर्ग जिल्हातील जन्मतः ओठ व टाळू फाटलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे उपक्रम
ज्यांचे जन्मतः च ओठ किंवा टाळू दुभंगलेले आहेत अशा रुग्णांची ऑपरेशन स्माईल व इंगा फाऊंडेशन व्दारा केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल, बेळगांव येथे
संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत.
देश विदेशातील तज्ञ शल्य चिकित्सक, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ इत्यादींच्या देखरेखी खाली व मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया व पुढील उपचार केले जाणार आहेत. या शस्त्रक्रिया अथवा उपचारासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. तसेच रुग्णासोबत एक नातेवाईकासाठी मोफत भोजन, प्रवास व निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.
अशा रुग्णांची ओळख, व शस्त्रक्रिया पूर्व तपासणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होणार आहे तर शस्त्रक्रिया बेळगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल येथे होणार आहेत.
सदर मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घेऊ इच्छिणा-या रुग्णांनी दिनांक २० एप्रिल, २०२५ पर्यंत संकल्प प्रतिष्ठान, मोबा नं.९३०७१०३४०२ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.