“श्री डेंटल क्लिनिक”चा कणकवलीत दिमाखात शुभारंभ

अद्ययावत मशनरी सह क्लिनिकच्या माध्यमातून डॉ. तनुजा चिंदरकर यांचा अनुभव दंतचिकित्सेच्या सेवेत रुजु
जिल्हाभरातून “श्री डेंटल क्लिनिक” वर शुभेच्छांचा वर्षाव
कणकवली शहरातील वैद्यकीय क्षेत्रात “श्री डेंटल क्लिनिक” च्या माध्यमातून दंतचिकित्सा उपचारांची सुविधा जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. डॉ. तनुजा अक्षय चिंदरकर यांच्या “श्री डेंटल क्लिनिक” चा शुभारंभ जिल्ह्यातील नामवंत ॲड. विद्याधर चिंदरकर यांच्या हस्ते आज रविवारी रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. डॉ. तनुजा अक्षय चिंदरकर यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी दंतचिकित्सक म्हणून काम करत होत्या. त्यांनी आपल्या या नवीन क्लीनिक ची सुरुवात कणकवली महाडिक कंपाउंड (श्रीधर नाईक चौकासमोर) येथील जागेत केली असून आज या श्री डेंटल क्लिनिकच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. श्री डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून कणकवली सह जिल्हा वासियांच्या सेवेत दंतचिकित्से करिता नवीन क्लिनिक रुजू झाले असून अद्ययावत मशनरी सह डॉ. तनुजा यांचा या क्षेत्रातील अनुभव देखील रुग्णांना फायदेशीर ठरणार आहे. या शुभारंभ प्रसंगी ॲड. विद्याधर चिंदरकर यांच्यासह सौ. शैलेजा विद्याधर चिंदरकर , ॲड. अक्षय चिंदरकर, आदी उपस्थित होते. श्री डेंटल क्लिनिक ला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्ह्यातील प्रसिद्ध ॲड. उमेश सावंत, ॲड. राजेश परुळेकर, ॲड. संदीप राणे, ॲड .संयोगिता राणे, ॲड. मिलिंद सावंत, ॲड . भालचंद्र पाटील, कुडाळ येथील ॲड . मीहीर भनगे, ॲड. संदीप वंजारे, ओंकार परुळेकर यांच्यासह जिल्हाभरातील वकील व विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी