माजी आमदार प्रमोद जठार यांचा 18 एप्रिल रोजी 60 वा वाढदिवस मुंबईत साजरा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती
19 एप्रिल रोजी कणकवली कासार्डे येथील निवासस्थानी देखील वाढदिवस साजरा होणार
माजी आमदार प्रमोद जठार यांचा 60 वा वाढदिवस मुंबई भायखळा (पूर्व) राणीबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे . या वाढदिवसाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, सांस्कृतिक मंत्री व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्योद्योग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना नेते यशवंत जाधव, भाजपा नेते मधु चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक उदय निरगुडकर आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत . या वाढदिवसाच्या निमित्ताने मीनल दांडेकर प्रस्तुत अमेय दाते लाईव्ह हा गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम व स्नेह भोजन देखील आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 96 19 66 38 88 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच 19 एप्रिल रोजी माजी आमदार प्रमोद जठार मित्र मंडळाच्या वतीने सायंकाळी 7 वाजता कासार्डे येथील प्रमोद जठार यांच्या निवासस्थानी 60 वा वाढदिवस सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने अस्सल मराठमोळा कलाविष्कार उत्सव ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद जठार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.