खारेपाटण पंचशील नगर येथील रस्ता विकासकामाचा शुभारंभ संपन्न …

अनुसूचित जाती – जमाती वस्तीचा विकास करणे विशेष घटक योजना सन २०२४ – २५ अंतर्गत खारेपाटण पंचशील नगर येथील मधुकर रामा पाटणकर घर ते प्रभाकर रामचंद्र पोमेडकर यांचे घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ आज सोमवारी खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी खारेपाटण उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य श्री किरण कर्ले, सौ अमिषा गुरव,सौ शीतीजा धुमाळे,सौ अस्ताली पवार,श्री सुधाकर ढेकणे,श्री जयदीप देसाई,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर, खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री प्रणय गुरसाळे,देवानंद ईसवलकर,शेखर कांबळी,सौरभ धालवलकर,अनिकेत गुरव,पंचशील नगर येथील ग्रामस्थ श्री मधुकर पाटणकर,श्री संतोष जुवाटकर,श्री अशोक पाटणकर,श्री सागर पोमेडकर,संदीप पाटणकर,प्रथमेश कदम,कुणाल पाटणकर,सौ पूजा कदम,श्रवण पाटणकरआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गेली बरीच वर्षे या रस्त्याबाबत ग्रामस्थांची मागणी होती.आज अखेर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झाले असून सुमारे १२ लाख एवढा विकास निधी या कामासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.याबद्दल स्थानिक ग्रामस्थानी ग्रामपंचायत व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!