सांगवेतील माजी सैनिक प्रभाकर चांदोस्कर यांचे निधन

भारतीय सैन्यदलातून नायब सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेले सांगवे-आंबेडकरनगर येथील माजी सैनिक प्रभाकर धर्माजी चांदोस्कर वय 85 यांचे गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी निधन झाले. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर प्रभाकर चांदोस्कर हे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत होते.
माजी सैनिक असलेल्या प्रभाकर चांदोस्कर यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे शालेय समिती सदस्य, कणकवली शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था कणकवलीचे माजी चेअरमन, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे संरक्षण प्रमुख, सांगवे बौद्ध विकास मंडळ ग्रामीणचे माजी अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना सांगवे बौद्धविकास मंडळाच्यावतीने शनिवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा. सांगवे आंबेडकरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.