गांगेश्वर मित्र मंडळातर्फे दिक्षा नाईक,आरव आईर यांचा सन्मान

झी मराठी चॅनेल वरील ड्रामा ज्युनिअर्स या टीव्ही शो चा फायनलीस्ट आरव आईर, तसेच मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या सुंदरी या सेलिब्रिटीं कलाकारांच्या डान्स शो मध्ये निवड झालेल्या कुडाळ येथील नृत्यांगना दिक्षा प्रमोद नाईक यांचा सत्कार आचरा देवूळवाडी येथील गांगेश्वर मित्र मंडळातर्फे मधुकर घाडी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांच्या सोबत आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी, गांगेश्वर मित्र मंडळाचे अनिकेत घाडी, रामचंद्र घाडी, सदानंद घाडी,दिपक घाडी, नितीन घाडी,मंगेश घाडी,भाऊ घाडी,संदिप नलावडे, चिमणी पाखरे डान्स अकॅडमी चे रवी कुडाळकर आदी उपस्थित होते.