ॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

गेली 30 वर्षाहून अधिक काळ ॲड. परब आहेत वकिली व्यवसायात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुका न्यायालय व जिल्हा न्यायालयामध्ये देखील त्यांनी आपला वकिली व्यवसाय केला आहे. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून विलास परब यांची विशेष ओळख आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. परब यांचे अभिनंदन केले जात आहे.
कणकवली प्रतिनिधी