आरोग्य विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

तब्बल 250 हुन अधिक विद्यार्थ्यांची करण्यात आली तपासणी

पीएम श्री जि प शाळा कणकवली क्रमांक 03,येथे शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर दि.06/02/25रोजी घेण्यात आले या शिबिरामध्ये 250 मुलांची आरोग्य तपासणी बरोबरच, ब्लड ग्रुप, ईतर रक्ताच्या तपासणी करण्यात येऊन जवळपास 100 मुलांचे आभा आयडी काढण्यात आले. याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले योजना, कीटकजन्य आजार, जलजन्य आजार, लसीकरण कार्यक्रम, क्षयरोग इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी मान. वैद्यकीय अधीक्षक ,डॉक्टर विशाल रेड्डी, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,प्रशांत बुचडे,वैशाख गोसावी, डॉ. वाघमारे,डॉ. संजय चाटे, श्री.चेतन कोरे,श्रीम.भारती भोसले, शीतल पालव,नीता दाभोळकर,रश्मी नाईक, याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राणे मॅडम व ईतर पालक आणि उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी ,शाळा क्रमांक 3 चे शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!