संस्थान आचरेच्या डाळपस्वारीस उत्साहात सुरुवात भाविकांचा उसळला जनसागर
तोफा दणाणल्या बंदूकीच्या फैरी झडाडल्या ढोल ताशांच्या गजरात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत, भाविकांना आशिर्वचन देत आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या डाळपस्वारीस रविवारी सकाळी रामेश्वर मंदिर येथून सुरुवात झाली. वाटेत भाविकांची गा-हाणी ऐकत आशिर्वचंन देत श्री देव रामेश्वराची स्वारी भर दुपारी
बाजारपेठ येथील फुरसाई मंदिरात आली. येथील डाळप करून मिराशी वाडी ब्राम्हणदेव येथे भेट दिल्यानंतर सायंकाळी नागझरी गिरावळ मंदिर (पूर्वी आकारी)येथे विसावली.या डाळपस्वारीसाठी चाकरमानीही मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत.
फुरसाई मंदिर येथे मुंबई येथील वास्तुशास्त्रज्ञ मधुकर लाड यांनी भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.तर मिराशी वाडी येथेही गोड शिरयाचे वाटप करण्यात आले.बालगोपाळ मंडळ तसेच ठिकाणी शितपेयांचे हि वाटप केले जात होते.
आचरा ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
डाळपस्वारीसाठी ग्रामस्थांना टोप्यांचे वाटप*
विकासाचा आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या आचरा ग्रामपंचायत तर्फे डाळपस्वारीत देवस्वारीसोबत फिरणाऱ्या ग्रामस्थांना उन्हापासून संरक्षणासाठी सरपंच जेराॅन फर्नांडिस आणि सहका-यांच्या सहकार्याने सफेद टोप्यांचे वाटप करण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवार पर्यंत चालणा-या या डाळपस्वारीत सोमवारी तीन फेब्रुवारी ला गिरावळ मंदिर येथे देवस्वारया मुक्कामाला थांबणार आहेत. मंगळवारी दुपारनंतर रास पोटाळून भंडारवाडी, बौद्धवाडी स्थळ येथील डाळप करुन सायंकाळी उशिरा गाउडवाडी ब्राह्मण देव मंदिर येथे विसावणार आहेत.