एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस ,कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.एकूण ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.यश गोसावी या विद्यार्थ्यांने तेरावा क्रमांक पटकावला.
एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लासला हायस्ट मोटिव्हेशन आणि एन्थुसिअसम चा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत एकूण २५७३ विद्यार्थी सहभागी होते.सहा मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते.अथर्व गंगावणे, जागृती खरात, तनया पवार, हंशल कदम रूचा सावंत, ईशान ठाकूर, शाश्वत तांबे आणि खुशी तावडे यांनाही बेस्ट परफॉर्मरची ट्राॅफी देऊन सन्मानित केले. या सर्व विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालिका सौ.पूजा राणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!