जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक 5 चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच चे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी एचपीसीएल हॉल कणकवली येथे संपन्न झाले
यावेळी उद्घाटक म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे विजयकुमार वळंजू माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अबिद नाईक, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी जे कांबळे सर कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष केतकी दळवी शिक्षण प्रेमी सदस्य सौ. उज्वला जावडेकर शाळेचे मुख्याध्यापक कल्पना मलये, उपशिक्षक शर्मिला चव्हाण माजी मुख्याध्यापक शुभदा पारकर, सौ. हुमेरा नाईक अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी यावेळी लक्षवेधी ठरली. ईशस्तवन आणि सागर पद्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय विजय कुमार जिवंत साहेब यांच्या हस्ते शाळेचे हस्तलिखित बहर चे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्पना मलये यांनी मांडले. स्वागत शिक्षण सहाय्यक विशाखा धुमाळे यांनी केले.
विजयकुमार वळंजू साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की शालेय जीवनात अशा प्रकारचे प्रेरणा आणि कौतुकाची थाप पुढील आयुष्यात मार्गदर्शक ठरते शाळेने अधिकारी शैक्षणिक गुणवत्ता विकास साधत प्रगती करावी . शाळेच्या विकासाकरिता मी सदैव पाठीशी असेन. अबिद नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शहरी भागातील शाळा असून पटसंख्या वाढवणे आणि टिकवणे याकरिता शाळेचा अधिकारीक भौतिक विकास होणे गरजेचे आहे . शाळेच्या भौतिक विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे शाळेसाठी याआधीही दुरुस्ती करता निधी प्राप्त करून दिला असून लवकरच शाळेच्या फरशी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शाळेमध्ये ज्ञानदानाचे चांगल्या प्रकारे काम घडत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जात आहे.
मुख्याध्यापक विद्यामंदिर हायस्कूल आदरणीय पी जे कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हस्तलिखिताचे कौतुक करताना सांगितले की अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सातत्याने लिखाण करत राहिल्यास विद्यार्थी पुढील आयुष्यात चांगल्या प्रकारे यशस्वी होतील विद्यार्थ्यांमधून लेखक घडणे गरजेचे आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानावर आधारित विद्यार्थ्यांना अनेक उपस्थित पालकांना संबोधित केले आणि संविधानाची आपल्या आयुष्यातील गरज स्पष्ट केले तसेच संविधानानुसार देशाचा कारभार चालणे आवश्यक असून आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचे पालन केले पाहिजे असे आवाहन केले.
यानंतर वर्षभरातील विविध उपक्रम संविधानावर आधारित विविध स्पर्धा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी शाळेसाठी देणगी देणारे विविध देणगीदार या सर्वांचे सन्मान व सत्कार करण्यात आले. शाळेच्या उपशिक्षक शर्मिला चव्हाण यांचा तालुकास्तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शाळेसाठी बहुमूल्य असे योगदान देणारे रमाकांत पावस्कर निशांत काणेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला
यानंतर शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कणकवली कॉलेजचे प्राचार्य आदरणीय युवराज महालिंगे सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळा कणकवली क्रमांक पाच माजी विद्यार्थी समीक्षा कोरगावकर आणि भारती मेणसे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच स्वयंपाकी संदिशा शिगवण रसिका मिराशी पालक किरण दळवी या सर्वांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन उपशिक्षक शर्मिला चव्हाण यांनी केले आभार सहाय्यक शिक्षक विशाखा धुमाळे यांनी मांनले.
सर्व विद्यार्थी पालक शिक्षक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

error: Content is protected !!