मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन व विद्यार्थ्यांचे अभिवाचन

रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वाचन मंदिर येथे पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन व शालेय विद्यार्थ्यांचे अभिवाचन असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व प्रतिमापूजना नंतर संस्थेचे आजीव सभासद आणि उत्कृष्ट वाचक दिलीप हुनारी व यशराज संघटना आचराचे अध्यक्ष मंदार सरजोशी यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले.यावेळी रामेश्वर वाचन मंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे,अशोक कांबळी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, सांस्कृतिक समितीच्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, ग्रंथपाल विनिता कांबळी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले. अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, उदघाटक दिलीप हुनारी यांनी आपली मराठी भाषा व वाचन संस्कृती यावर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके घेऊन त्यातील आपल्याला आवडलेल्या उताऱ्याचे वाचन केले. अभिवाचन करणाऱ्या मुलांना उपाध्यक्ष अशोक कांबळी यांजकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
सदर ग्रंथप्रदर्शनाचा व अभिवाचनाचा लाभ वाचक सभासद तसेच ग्रामस्थांनी घेतला. उपस्थित सर्वांचे आभार ग्रंथपाल सौ. कांबळी यांनी केले.

error: Content is protected !!