माझ्या सेवानिवृत्तीनंतर ग्रामस्थांनी केलेला सत्कार अविस्मरनीय – प्रमोद डगरे

पोलीस उपनिरिक्षक प्रमोद डगरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

सिंधुदुर्ग पोलीस दलात मी गेली 33 वर्षे प्रामाणिक सेवा केली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये व मुख्यालयांमध्ये माझी सेवा झाली. मात्र , पोलीस दलात काम करत असताना तारेवरची कसरत असते, त्यातून अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत माजी पदोन्नती झाली. सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या असलदे गावात माझा झालेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. पोलीस दलात चांगल्या केलेल्या कामाची पोचपावती माझ्या गावाने दिली आहे.माझ्या सेवानिवृत्तीनंतर ग्रामस्थांनी केलेला सत्कार अविस्मरनीय असल्याचे प्रतिपादन सेवा निवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रमोद डगरे यांनी दिली.
असलदे ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी असलदे विकास सोसायटी व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने सेवा निवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रमोद डगरे यांचा सरपंच चंद्रकांत डामरे व चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ , भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी संचालक छत्रुघ्न डामरे , महेश लोके , रघुनाथ लोके , प्रदिप हरमलकर, अनिल नरे , दत्ताराम कोठारकर , सत्यवान लोके , संतोष परब, विजय डामरे, वासुदेव दळवी, ग्रामपंचायत सदस्या सपना डामरे, आनंदी खरात , प्रविण डामरे ,शिक्षिका अर्चना लोके, शिक्षिका सुवर्णा सावंत, तलाठी माधुरी काबरे, ग्रामसेवक संजय तांबे , मधुसुदन परब, सत्यवान घाडी ,अंगणवाडी सेविका कोमल परब, सायली दळवी , गवस साटविलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले , आपल्या गावातील प्रमोद डगरे पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत काम करुन सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले, आपल्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातून प्रमोद डगरे यांनी पोलीस दलात जावून चांगली सेवा बजावली आहे. 33 वर्षे पोलीस दलात काम करत असताना एकही कुठला डाग त्यांच्या सेवा कालावधीत लागलेला नाही . भविष्यात प्रमोद डगरे आपला अनुभव व कायद्याचे ज्ञान गावाच्या हितासाठी ते निश्चितच उपयोगात आणतील. गावासाठी प्रमोद डगरे यांचा अभिमान आहे.
यावेळी ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!