खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी

प्राचार्य डॉ. ए डी कांबळे व मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचा विशेष सत्कार …

खारेपाटण येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दीन कार्यक्रमाचे औचित्य साधून खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे तर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा विशेष सत्कार सरपंच सौ प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
शेठ न.म.विद्यालय खारेपाटण च्या भव्य पटांगणावर प्रजासत्ताक दीन सोहळा तथा खारेपाटण गावचे सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थी,शिक्षक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी व भारतीय सेनेचे निवृत्त सैनिक श्री राऊत हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर,तसेच संस्थेचे सर्व संचालक माजी सरपंच श्री रमाकांत राऊत ग्रामविकास अधिकारी जी एस वेंगुर्लेकर ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,जयदीप देसाई,किरण कर्ले,शितिजा धुमाळे, मनाली होनाळे,धनश्री ढेकणे, अमिषा गुरव,अस्ताली पवार,दक्षता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेने नुकतेच खान अकॅडमी च्यावतीने घेण्यात आलेल्या शैशनिक स्पर्धेत राज्यातील टॉप १० शाळांमध्ये यश संपादन केल्या बद्दल या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप दत्ताराम श्रावणकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास केंद्रीय समितीकडून भेट देऊन पाहणी केली असता नॅक कमिटी कडून महाविद्यालयास “बी” श्रेणी प्राप्त झाली असून या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, पत्रकार अस्मिता गिडाळे,सौ गौरी शिंदे,संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे,हायस्कूल मुख्याध्यापक श्री संजय सानप यांचा देखील सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!