खारेपाटण प्रा.आ.केंद्र शवगृह इमारत व रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

२५ लाख रुपये चा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर

खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथील शवगृह नवीन इमारतीचे व प्रा. आ. केंद्र येथील परिसर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज सोमवारी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपसरपंच -महेंद्र गुरव, माजी सरपंच -रमाकांत राऊत, माजी उपसरपंच -इस्माईल मुकादम,खरेपाटण गाव तंटा मुक्त समिती अध्यक्ष -प्रणय गुरसाळे, ग्रा. पं. सदस्य -किरण कर्ले, जयदीप देसाई, क्षितिजा धूमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार, वैद्यकीय अधिकारी -डॉ. निलोफर जमादार, आरोग्य सहाय्यक -के. एस. वानोळे इ. मान्यवर तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक नियोजन बजेट सन 2023-2024मधून मंजूर झालेल्या या कामासाठी सुमारे 25लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून खारेपाटण प्रा. आ. केंद्र शवगृह इमारत बांधणी 10लाख रुपये तर प्रा. आ. केंद्रातील इमारत परिसरातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामासाठी सुमारे 15लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून 25लाख एवढा खर्च या कामावर खर्च करण्यात येणार आहे.या कामाबद्दल सरपंच प्राची इस्वलकर यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व विद्यमान पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!