ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा कु.यश देऊ पवार यास बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन.

कणकवली/मयूर ठाकूर.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेचा विद्यार्थी कु.यश देऊ पवार याला नुकतेच बुद्धिबळ या खेळात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त झाले आहे यशने मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत उल्लेखनीय अशी कामगिरी करत या मानांकनाला गवसणी घातली आहे .
गोव्यात नुकत्याच संपन्न झालेल्या कै. चंद्रकांत नाईक स्मृती तसेच कै. गोपाळ सुखटणकर स्मृती या दोन अखिल भारतीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत चांगली कामगिरी करत 1511 जलद फिडे मानांकन प्राप्त केले आहे .लहान वयात घरातूनच बुद्धिबळाचे बाळकडू मिळालेल्या यशने चमकदार कामगिरी करत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!