“कोकण नाऊ” च्या बातमी नंतर कणकवलीत मटक्यावर कारवाई

कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक पण….
कारवाईत सातत्य राहणार का? जनतेतून उपस्थित केला जातोय सवाल
आजच्या कारवाईत 3 हजार 900 रुपये हस्तगत
गेले दोन दिवस मटका बंद ठेवल्यानंतर आजपासून कणकवलीत मटका सुरू झाल्याबाबत कोकण नाउ च्या माध्यमातून आज सकाळी वृत्तप्रसारित केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीतील एका मटका बुकिं वर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 3 हजार 900 रुपये हस्तगत करण्यात आले. मात्र कणकवलीत या कारवाईची चाहूल लागताच काही वेळातच कणकवलीतील सुरू झालेले अनेक मटक्याचे स्टॉल बंद करण्यात आले. तर काही बुकिं कडून व्हाट्सअप द्वारे काम घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज पोलिसांनी केलेली कारवाई केवळ औट घटकेची ची कारवाई न ठरता यामध्ये सातत्य राखण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज केलेल्या कारवाई मध्ये कणकवली पटकी देवी कडे बौद्धवाडी नजीक एका पत्र्याच्या स्टॉलमध्ये मटका घेत असताना मनोज तात्या हर्णे (रा. पटकीदेवी कणकवली) याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 अ नुसार कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्यासह हवालदार सुभाष शिवगण, राजकुमार आघाव यांच्या पथकाने ही कारवाई केली. हे पथक कारवाईसाठी निघाल्याचे समजतात अनेक मटका घेणाऱ्यानी सुरू असलेले मटक्याचे काम घेण्याचे बंद करण्यात आले. त्यामुळे आता ही कारवाई सातत्याने होते की केवळ बातमी पुरतीच राहते ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली