तोंडवळी येथील आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

आचरा प्रतिनिधी तोंडवळी खाडीपात्रात चालू असलेल्या वाळू उत्खननाकडे मालवण तहसीलदार, महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त तोंडवळी ग्रामस्थांनी बुधवार पासून सुरू केलेले वाळू उत्खनन विरोधातील आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान मालवण तहसीलदार हे ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तोंडवळी ग्रामस्थांनी पेंडुर येथे आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत याबाबत निवेदन देत लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे.जल आलेखन सिमांकन निश्चिती होईपर्यंत वाळू उत्खनन पुर्ण बंद होण्याबाबत तहसीलदार उपस्थित राहून ठोस निर्णय देत नाही तसेच ग्रामस्थांनी पकडलेल्या वाळू होडीवर काय कारवाई केली हे जोपर्यंत तहसीलदार जागेवर येऊन लेखी उत्तर देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.वाळू उत्खनना विरोधात बुधवार पासून सुरू केलेले तोंडवळी वासियांचे आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की शासनाची कुठलीही प्रकारांची मदत नसताना आमचा जीव धोक्यात घातला आणि एक वाळू काढणारी बोट पकडली बोट पकडण्याच्या आधी आम्ही सगळ्यांना फोन केले होते तहसीलदार पोलीसना फोन केला होता पण तिथे दिरंगाई करण्यात आली, वेळ वाया घावण्यात आला पण आम्हाला त्यांच्याकडून कुठली मदत मिळाली नाही महसूल प्रशासन सांगत आहे की बोट मिळाली तर परवाना रद्द करू पण आम्ही जी बोट पकडून दिली त्याला परवानाच नाहीये मग हे काय रद्द करणार याचं उत्तर महसूल विभागाने द्यावे त्या बोटीचा फक्त पंचनामा करून पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आली पण त्याचा पुढे काय झालं त्याच्यावर काय कारवाई झाली याचे उत्तर मालवण तहसीलदार यांनी लेखी द्यावे ती कारवाई आम्हाला दाखवावी तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ मागे हटणार नसल्याने त्यांनी सांगितले विधानसभा अध्यक्ष पेंडुर गावात आले हे समजण्यानंतर आम्ही तोंडवळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत आमची व्यथा मांडून निवेदन दिले. आम्ही ग्रामस्थ सतत वाळू उत्खनन विरोधात प्रशासनाकडे तक्रार करतोय पण आम्हाला कुठलाही तिथून काही दिलासा मिळत नाहीये काही ठोस निर्णय त्यांच्याकडून मिळत नाही असे अध्यक्ष यांना आम्ही सांगताच तेथे उपस्थित असलेल्या मालवण तहसीलदार यांना याबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विचारना केली असता त्या निरुत्तर झाल्या. पुढच्या सात दिवसांमध्ये लेखी अहवाल घेतो आणि मग पुढे जे काय ते बघतो असे आश्वस्त विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केले असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली

error: Content is protected !!