विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज वेंगुर्ले मातोंड येथील श्री देवी सातेरी मंदिरात जावून देवी सातेरीचे दर्शन घेतले. निवडणुकीपूर्वी राहूल नार्वेकर हे मातोंडला आले होते व देवीकडे साकडे घातले होते. आता ते निवडून आल्यानंतर विधानसभेचे पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे ते आज पुन्हा सातेरी मंदिरात येऊन देवीच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी होणारी विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.