चिंदर येथील युवा उद्धोजक गणेश गोगटे यांना पितृशोक…!

भालचंद्र उर्फ राजू गोगटे यांचे निधन

चिंदर गावचे मानकरी, उपाध्य भालचंद्र उर्फ राजू सिताराम गोगटे यांचे काल रात्री चिंदर भटवाडी येथील रहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांत, मनमिळावू म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुलगे, पुतणे असा मोठा परिवार आहे. चिंदर गावचे युवा उद्योजक, आचरा येथील व्यावसाईक आई माऊली इलेक्ट्रॉनिकचे मालक, चिंदर सेवा संघाचे खजिनदार, गणेश गोगटे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातआहे.

error: Content is protected !!