मालडी येथील मुळेकर परिवाराचा परीचय स्नेह मेळावा – 19 जानेवारी रोजी मुंबईत आयोजित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये स्थायिक असलेल्या सर्व मुळेकर कुटुंबीयांना कळविण्यात येत आहे की, रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील भांडुप येथे मुळेकर परिवाराचा परीचय स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व कुटुंबीयांना एकत्र आणणे, आपसातील नाती अधिक घट्ट करणे, जुनी नाती जोपासणे, नवीन नातेसंबंध निर्माण करणे आणि परिवार संघटित ठेवणे हा आहे.
भांडुप येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन आडवली मालडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील ग्रामस्थ विनोद मुळेकर, शेखर मुळेकर, संदीप मुळेकर, प्रमोद मुळेकर आणि मनीष मुळेकर या बंधूंनी केले आहे. त्यांनी सर्व मुळेकर कुटुंबीयांना या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दीपप्रज्वलन, कुलस्वामिनीचे पूजन व आरतीने होईल. त्यानंतर कौटुंबिक परिचय व लहानग्या कलाकारांचे मनमोहक सादरीकरण करण्यात येईल. दुपारच्या भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल.
या मेळाव्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये स्थायिक असलेल्या मुळेकर कुटुंबीयांनी एकत्र येऊन आपसातील ओळखी पक्क्या कराव्यात, नातीगोती दृढ करावीत आणि नवीन नातेबंध निर्माण करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“चला, वाद विसरून संवाद साधूया” हे या मेळाव्याचे घोषवाक्य असून, सर्व मुळेकर परिवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
संपर्क:
विनोद मुळेकर: 9969205617
संदीप मुळेकर: 9920389422