साकेडी येथील वारकरी दिंडी भजन स्पर्धा 25 जानेवारी रोजी

जिल्हाभरातून या स्पर्धेत येणार वारकरी भजन संघ
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन
कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ च्या वतीने दरवर्षाप्रमाणे या सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी व भजन स्पर्धेचे आयोजन शनिवार 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सकाळी फौजदारवाडी चव्हाटा या ठिकाणी करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते केले जाणार आहे. या निमंत्रित भजन संघाच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 7 हजार 1 रुपये, द्वितीय 4444 व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट गायक अशी वैयक्तिक पारितोषिके देखील दिली जाणार आहेत. या स्पर्धेच्या माहितीसाठी व संपर्कासाठी भूषण शिरसाट 9890488283, सागर राणे 9420 760256 ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी रुपेश मेस्त्री, भूषण शिरसाट, प्रणय दळवी, ललित राणे व सागर राणे यांच्या नंबर वर संपर्क साधावा.