खारेपाटण विद्यालयाची प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

कै. श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ वाडा देवगड येथे दीक्षित फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण प्रशालेची इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कुमारी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने सादर केलेल्या ‘जिवलगा कधी रे येशील तू?’ या भावगीताने उपस्थित रसिक प्रेक्षकांची आणि परीक्षकांची वाहवा मिळविली. या तिच्या सादरीकरणाबद्दल तिचा आयोजक आणि परीक्षकांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन तिला गौरविण्यात आले. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये प्राजक्ताने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या गायन कलेची चुणूक दाखविली होती. प्राजक्ताने अनेक जिल्हा, राज्यस्तरीय गायन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. कु. प्राजक्ताला प्रशालेचे संगीत शिक्षक श्री.संदिप पेंडुरकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री.प्रवीण लोकरे सर, सर्व संस्था संचालक, प्राचार्य श्री. संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने प्राजक्ताचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या…

error: Content is protected !!