नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवा निमित्त स्पर्धेचे आयोजन

घरगुती सजावट तसेच रिल स्पर्धा

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या२२१ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कणकवली शहरातील नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.याचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी बाजारातील आंबेआळी येथील नाना कोदे यांच्या घरगुती सजावट स्थळाकडे उद्योजक प्रकाश कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. घरगुती सजावट स्पर्धेसह यंदा सोशल मीडिया जनजागृती म्हणून रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रील स्पर्धेसोबतच नागरिकांनी घरगुती सजावटीत सहभाग घेतल्याने भालचंद्र महाराज रोड,बाजारपेठेत सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारताना दिवाळी सणाची अनिभूती येते. गुरुवार दि. १६ पासून सोमवार दि.२० तारीखपर्यंत स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून नमो नमो भालचंद्राय या ग्रुपला टँग करून या रील स्पर्धेत देखील आपल्याला सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे या उत्सवात वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हा जन्मोत्सव व्दिगुणित व्हावा.तसेच शहरात भक्तिमय वातावरणासोबतच शहर स्वच्छ सुंदर करत समाज प्रबोधन व्हावे. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या स्पर्धेत घर सजावट करिता प्रथम क्र. ७ हजार ७७७ रु.,द्वितीय ६ हजार ६६६ रु,तृतीय ५ हजार ५५५ रु..चौथा ४ हजार ४४४ पाचवा ३ हजार ३३३ तर उत्तेजनार्थ प्रथम १ हजार १११ रु. उत्तेजनार्थ व्दितीय १ हजार १११ रु.उत्तेजनार्थ तृतीय १ हजार १११ रु. प्रत्येकी सन्मान चिन्ह तसेच रील स्पर्धेतील विजेत्यास ३ हजार रु. ,व्दितीय २ हजार रु. आणि तृतीय १ हजार रु. देऊन गौरविण्यात येणार आहे.
या शुभारंभावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर प्राध्यापक हरिभाऊ भिसे , ज्येष्ठ दत्ता सापळे,उमेश वाळके, उद्योजक राजू मानकर, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजू पारकर, राजा कामत, नीता केळुसकर, भैया आळवे,श्रीमती कोदे,बाळा शिरसाठ, महेश अंधारी, अमित सापळे,चेतन अंधारी,संदीप अंधारी, चेतनताम्हणकर, प्रद्युम मुंज, गौरव हर्णे, सतीश मसुरकर श्री प्रसाद तांबट सर महेश शिरसाठ आदी मंडळाचे कार्यकर्ते,नागरिक व महिलावर्ग तसेच भाविक भक्त उपस्थित होता.

दिगंबर वालावलकर/कणकवली

error: Content is protected !!