खारेपाटण येथे ग्राम संवाद उपक्रम संपन्न..

कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी ग्रामसंवाद उपक्रमाचे उद्दिष्ट व महत्व समजावून देत ग्रामस्थांशी साधला संवाद
जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे आदेशान्वये कणकवली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील खारेपाटण या गावी कणकवली तालुका पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे नुकताच ग्रामसंवाद मेळावा संपन्न झाला.
खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या ग्रामसंवाद मेळाव्यास पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे,श्री किरण कदम,पोलीस पाटील श्री दिगंबर भालेकर,ओंकार चव्हाण,खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री प्रणय गुरसाळे, खारेपाटण उपसरपंच श्री महेंद्र गुरव ग्रा.पं. सदस्य सौ शीतिजा धुमाळे,सौ मनाली होणाळे,धनश्री ढेकणे, सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव, महेश कोळसूळकर,पत्रकार श्री संतोष पाटणकर,रमेश जामसंडेकर, नंदकिशोर कोरगावकर,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनंत गांधी,विजय देसाई,भाऊ राणे,सुधीर कुबल सौ उज्ज्वला चिके,खारेपाटण व्यापारी असोसीएशनचे अध्यक्ष प्राजल कुबल,खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम ग्राम विकास अधिकारी आर जी वेंगुर्लेकर तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांनी ग्रामसंवाद मेळाव्याचे उद्दिष्ट व महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. यावेळी ग्रामस्थानी आपल्या विविध समस्या पोलिसांसमोर मांडल्या. यामध्ये खारेपाटण शहरात गेले बरेच महिने बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्यात यावेत, खारेपाटण पोलीस स्टेशन ची मूळ पडझड झालेली जुनी इमारत नव्याने बांधण्यात यावी.खारेपाटण आठवडा बाजारासाठी तसेच धार्मिक सन उस्त्ववासाठी अधिक पोलीस कर्मचारी वर्ग देण्यात यावेत. खारेपाटण मध्ये मधील ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी आठवडा बाजारात ट्रॅफिक पोलिस देण्यात यावेत, खारेपाटण मध्ये एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह ४ पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात यावेत. खारेपाटण राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघात थांबविण्यासाठी सर्व्हिस रोड त्वरित बनविण्यात यावेत. खारेपाटण महसूल गावांसाठी सर्वत्र पोलीस पाटील पद भरण्यात यावे.तसेच नव्याने नियुक्त देण्यात आलेल्या पोलीस पाटील कर्मचारी याना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.आदी मागण्या ग्रामस्थांच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या.
प्रारंभी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभ हस्ते पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर उपसरपंच महेंद्र गुरव यांचे शुभहस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन
स्वागत करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर जी वेंगुर्लेकर यांनी केले.