शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स खारेपाटण आणि ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये करण्यात आली, या मध्ये बॉडी मास इंडेक्स, रक्त गट तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी व रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. एकूण 100 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन ASPM कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी,असिस्टंट प्रोफेसर व एन.एस.एस. प्रमुख अक्षय नर सर व शेठ न. म. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका चैत्राली वरूणकर मॅडम यांच्या मार्गर्शनाखाली केले. या कॅम्पचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य निर्देशकांबद्दल जाणीव करून देणे आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी मोफत सेवा प्रदान करणे आणि जर निर्देशांक सामान्य पातळीवर नसल्यास आवश्यक उपाययोजना करून घेण्याकरता योग्य ते मार्गदर्शन करणे हा होता.

error: Content is protected !!