कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक

कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी श्री.मधुकर जनार्दन देसाई ( वय ८१) यांचे रविवारी १२ जानेवारी रोजी कणकवली येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.ते मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिचीत होते.सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना,एक मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.कणकवली येथील चैतन्य क्लासेस चे शिक्षक श्री.अच्युत देसाई सर आणि कै.राजाराम मराठे काॅलेज फोंडाघाट चे संचालक श्री.जनार्दन देसाई यांचे ते वडील होत.
श्री.मधुकर देसाई यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता कळसुली गवसेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.त्यांच्या जाण्याने कळसुली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!