ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट एकत्र बैठक घेण्याबाबत माजी सरपंच टेमकर यांचे आचरा सरपंचांना निवेदन

देवस्थान जमीन प्रश्नी ग्रामस्थ आणि देवस्थान समिती यांची एकत्रित बैठक घेण्याबाबत आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. या निवेदनावर आचरे गावातील सतरा मंडळ प्रतिनिधिंसह ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.त्यांनी निवेदनात आचरे गावातील लोकांची व देवस्थान कमिटी यांची
चर्चा आपल्या ग्रामपंचायत माध्यमातून आपण आयोजित करण्यात यावी म्हणून आचरे गावातील सर्व मंडळां मार्फत आपणास विनंती करत असल्याचे निवेदन टेमकर यांनी दिले आहे या निवेदनात देवस्थान जमीन खरेदी विक्री होणे, कुळ लावणे, सातबारा वरील जी नावे काढण्यात आली त्या संदर्भात चर्चा करून तोडगा काढणे,
देवस्थान कमिटी सभासद करून घेणे, भविष्यात होणाऱ्या रस्ता भूसंपादन विषयी चर्चा होणे , जमिनी बिनशेती करणे या संदर्भात चर्चा करण्याची मागणी टेमकर यांनी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी , सचिन बागवे, छोटू पांगे आदी उपस्थित होते.