तलाठी सुनीता मेस्त्री यांचे काम आदर्शवत -माजी सरपंच मनोहर सावंत
कुणकवण येथे तलाठी सुनीता मेस्त्री यांचा सत्कार
कुणकवण ग्रामस्थांशी सलोख्याने वागत त्यांची महसूली कामे तत्परतेने करणा-या तलाठी मेस्त्री यांचे काम आदर्शवतच आहे. असे मत कुणकवण गावचे माजी सरपंच मनोहर सावंत यांनी व्यक्त केले.
गेली पाच वर्षे कुणकवण ग्रामस्थांना महसूली सेवा उत्तम प्रकारे देवून कुणकवण येथून बदली झालेल्या तलाठी सुनीता मेस्त्री यांचा कुणकवण येथे आयोजित गंगापूजनाच्या औचित्यावर ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायत सदस्य सुषमा जनक यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच जितेंद्र कदम,पोलीस पाटील सचिन राणे,तानाजी कदम, मंगेश गुरव, एकनाथ जनक, महेश कदम, मोहन कदम, रघुनाथ झोरे यांसह नुतन तलाठी,कोतवाल हर्षला राणे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी सौ सुनीता मेस्त्री यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.