युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सशर्थ अटकपुर्व जामीन मंजुर
आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
मुंबईतील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेंद्र मधुकर फाटक कल्याण, ठाणे मूळ राह. देवगड याला सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 तथा विशेष न्यायाधीश एस एस जोशी यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
फेब्रुवारी २०२३ मधे आरोपीने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून देवगड येथील आपले गावी आणून तसेच त्यानंतर सन २०२३ ते २०२४ या कालावधीत वैभववाडी व मुंबई येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्ती वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबत फिर्यादीने दिनांक २९/१०/२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 115(2), 352, 64,64(2)(m), 318(1), 318(3) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r)(s), 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला पन्नास हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला साक्षीदारांवर दबाव आणू नये, सरकार पक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये आदी अटी घातल्या आहेत.